**Welcome to RM college of Agriculture Navaha,we hearbly welcome to all of our visitors on website .Admission procedure for agriculture course is started for more info call Contact Us-- Dr.Patil V.D 9422877790 Dr. S.R.Pawar 9881252614 College Code--11289
Previous slide
Next slide
**Our Fello student received Medal in academics and off-campus research activity performed in various conference,seminar and hold rank in MCAER exam

Welcome to RM College of Agriculture, Navha

RM College of Agriculture, Navha is one of the primer Educational institute in the jurisdiction of the Vasantrao Naik Marathwada Krushi Vidyapith, Parbhani. It is part of the Society that runs a network of Schools, Colleges (Senior Colleges, Engineering Colleges and Agricultural Colleges),  at a number of places, occupying a significant place on the educational map of the state. As on date it is fully developed and accredited for excellence in quality education by Vasantrao Naik Marathwada Krushi Vidyapith, Parbhani.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला आजपासून सुरुवात


रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय नाव्हा येथील,राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत निवासी विशेष शिबिर धारकल्याण येथे आयोजित करण्यात आलेली आहे. शिबिराचे उदघाटन आज दि.4 मार्च रोजी झाले. उदघाटन करण्यासाठी उपस्थित मान्यवर म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस. आर पवार व प्रमुख पाहुणे लक्ष्मणराव कुलकर्णी अण्णा संस्थेचे सहसचिव व गावकरी मंडळीपैकी विष्णू घोडके, राजू ढोबळे ,किशोर कदम सरपंच धारकल्याण,गजानन ढोबळे चेअरमन व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग उदघाटनाला उपस्थित होते. उदघाटन करत असताना सर्वप्रथम रंगनाथ महाराज प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवराचे स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उदघाटन करत असताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री लक्ष्मणराव कुलकर्णी अण्णा यांनी मुलांना राष्ट्रीय सेवा योजनेची मूलतत्त्वांची माहिती दिली व त्यांना पुढील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस .आर. पवार यांनी मुलांना राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत त्यांच्या मध्ये काय बदल करू शकतो आणि तो बदल घडवून आणण्याचे महत्त्व त्यांना समजून सांगितले. उदघाटनाचा कार्यक्रम झाल्यावर श्रमदानाचा कार्यक्रम पार पडला . त्यानंतर प्रबोधनकार ह .भ .प .अंकुश महाराज रंगनाथ महाराज संस्थान यांनी मुलांना “फॅशन आणि व्यसन “याबद्दल जनजागृती केली फॅशन कशी आपल्या आयुष्याला घातक आहे आणि व्यसन आपल्या आयुष्यात कसे घातक आहे . आपले जीवन कसे बदलून टाकतो हे याचे महत्त्व अंकुश महाराजांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर कार्यक्रम अधिकारी प्रा. अवचार यांनी विद्यार्थ्यांना शपथ घेऊन सांगितले की मी व्यसन करणार नाही .हे ऐकून विद्यार्थ्यांनी लगेच व्यसन करणार नाही अशी शपथ सुद्धा सर्वांनी घेतली.

समाजाच्या विकासामध्ये युवकाचे योगदान अत्यावश्यक…कुलकर्णी.

राष्ट्रीय सेवा योजना
रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय नाव्हाचे विशेष शिबिर धारकल्याण येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उदघाटन संस्थेचे सचिव श्री लक्ष्मणराव कुलकर्णी यांनी केले तर अध्यक्ष स्थान उप प्राचार्य डॉ पवार यांनी भूषविले. उदघाटनपर भाषांमध्ये श्री कुलकर्णी यांनी युवकाच्या सक्रिय सहभागाशिवाय समाज उन्नतिकडे वाटचाल करू शकत नाही आणि त्यासाठी युवकांनी राजकारण,समाजकारण ,अर्थकारण आणि आध्यात्म यामध्ये रुची घेतली पाहिजे असे सांगितले. डॉ पवार यांनी महाविद्यालय आणि रा से यो या सांघटनेमुळे विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल घडून येतात आणि त्यासाठी महाविद्यालय सदैव कार्य करत आहे असे सांगितले. आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी श्री अंकुश अवचार यांनी केले. उदघाटन कार्यक्रमास श्री घोडके, राजू ढोबळे ,किशोर कदम सरपंच धारकल्याण,गजानन ढोबळे चेअरमन व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात रंगनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवराचे स्वागत झाले. उदघाटन झाल्यावर श्रमदानाचा कार्यक्रम पार पडला . त्यानंतर प्रबोधनकार ह .भ .प .अंकुश महाराज रंगनाथ महाराज संस्थान यांनी मुलांना “फॅशन आणि व्यसन यावर भाष्य करून नको ती फॅशन आणि व्यसन आपल्या आयुष्यात कसे घातक ठरत आहे हे विषद केले. त्याचं परिणाम विद्यार्थ्यांनी व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली.

धारकल्याण येथे भव्य रक्तदान शिबिर

रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय नाव्हा, येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर अंतर्गत चौथ्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी जालना रक्तदान केंद्र येथील कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेमधील सर्व विद्यार्थी आणि रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय येथील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. पाटील ,प्रमुख पाहुणे जालना रक्त केंद्र चे संचालक बाळासाहेब कोठारे व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.आर.पवार हे सर्व व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश अवचार यांनी केले यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे म्हणून सांगितले. त्यानंतर डॉ. एस. आर .पवार यांनी विद्यार्थ्यांना रक्तदान करणे किती महत्त्वाचे आहे याचे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले बाळासाहेब कोठारे यांनी मुलांना रक्तदानाचे फायदे आणि रक्तदान केल्याने तुमच्या शरीरामध्ये कसे रक्त तयार होते हे सांगण्यात आले. अध्यक्षीय भाषण डॉ. व्ही.डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना रक्तदान हे शिष्ठदान दर आहेच पण त्यापेक्षा एक श्रेष्ठदान आहे अवयव दान आणि आता तुम्ही जशी रक्तदान करताय तसे अवयव दान करा असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना उस्फुर्त केले.त्यानंतर कार्यक्रमाला रक्तदानात सुरुवात झाली. रक्तदाना मध्ये भव्य प्रमाणात विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापक वर्गांनी भाग घेऊन रक्तदान केले. नंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम रा.सो.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश अवचार यांनी पार पाडला. जालना रक्तदान केंद्राचे संचालक बाळासाहेब काठोरे यांचे आभार मानले. जालना रक्तदान केंद्र यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांना व प्राचार्य डॉ. व्हि.डी. पाटील सरांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.आणी अशी ग्वाही दिली की यानंतर तुम्हाला रक्त लागल्यास आमच्याशी संपर्क साधावा अशा रीतीने त्यांनी कार्यक्रम पार पडला.

राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष शिबिराचा समारोप

रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय नाव्हा येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरचा अनुभव कथन व समारोपचा कार्यक्रम काल पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. पाटील ,उपप्राचार्य डॉ. एस. आर पवार व कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश अवचार व इतर प्राध्यापक वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थ्यांची अनुभव कथन करून करण्यात आली. अनुभव कथनामध्ये विशेष शिबिरामध्ये विद्यार्थी काय शिकले, त्यांच्यावर कोणते प्रसंग आले, त्याचे वर्णन विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अनुभव कथन मध्ये सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांगितले की ह.भ.प. अंकुश महाराज यांच्या प्रबोधन कीर्तनानंतर सर्व विद्यार्थ्यांनी अशी शपथ घेतली की आम्ही व्यसन करणार नाही.त्यामधून आमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडू शकतात असे विद्यार्थ्यांनी अनुभव कथन मधून सांगितले. त्यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.आर.पवार यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेमधून कसे सामाजिक कार्यकर्ते घडतात आणि त्याचे महत्त्व हे समजून सांगितले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अध्यक्षीय मार्गदर्शन म्हणून डॉ. व्ही. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक आर्थिक बाबीचे मार्गदर्शन केले. डॉ.व्ही.डी पाटील सर किमान सात वर्ष कार्यक्रमाधिकारी असताना त्यांनी कार्यक्रम कशाप्रकारे घेतले. विद्यार्थ्यांमध्ये त्यामधून कसे बदल घडून आले आणि शक्ती राष्ट्रीय सेवा योजनेची किती मोठी शक्ती आहे ही विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेमधून सर्वच काही करू शकता तुम्ही आर्थिक, राजनीतिक, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक धार्मिक, सगळे कार्यक्रम तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेमधून राबवू शकता असे मार्गदर्शनाध्यक्षांनी केले. व त्यानंतर रा.सो. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.अंकुश अवचार यांनी सर्वांचे आभार आभार मानून अध्यक्ष च्या वतीने कार्यक्रम व विशेष शिबिर याचा समारोप करण्यात आला.

 

 

 

Quick Links

PATRON

Agriculture being prime field, lot of opportunities are there in public and private sectors besides own farming and….

DIRECTOR

India is an Agricultural Country, about 70% of our population depends on agriculture. To increase  productivity..

PRINCIPAL

Dr. Vilas Patil

College of agriculture will achieve all success in its future  to improve the farming community across the country…..

CAMPUS ENVIRONMENT

RECENT EVENT

RECENT ACTIVITY

NSS

SPORT

INDUSTRY TIEUPS

Visions

  • To meet global, local needs and challenges in agriculture sector through innovation and knowledge transformation between India and other countries.
  • Development of farming community by adoption of advanced agricultural technologies with extension, demonstration, education and future researches.
  • Making students not only educationally sound but also efficient in making decisions at policy levels in all sectors

Missions

  • To seek and gain worldwide respect and recognition as India’s leader in the field of agriculture education and to become best resource for academic studies and competencies.
  • Our intention to produce scientific leaders, work with world class institute and continue to grow and evolve in response to the changing the needs of society

Competitive Exam Forum

 

LIBRARY 

Available Books

Available books regarding competative exam like banking upsc mpsc ssc etc

we have various and vast collection of books written by various authors and mpsc asparients 

we also have an contact with 3 competative carrier academy of Jalna

 

READING ROOM

Forum

Having  fair environment is much more necessary which develope an extra in asparients 

Our techers provided a better forum with additional benefits which include books newspaper study notes etc

We have additional library and reading room for asparients and also a vast community group

 

AUDITORIUM

Lectures

Having a great teachers will help you to achieve your carrier as soon as possible .

Our staff provide lecture live   classesand other important things for students

Agricultural have additional benifits of their degree for agri banking , agri mpsc and other fied

Contact Us

Facebook Page

Campus Video

Important Links

error: Content is protected !!
Scroll to Top